हरीश शर्मा | मुख्य संपादक: दि. २२ जानेवारी तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर होत असलेल्या पुणे जिल्हा परिषद व जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. एकूण २१९ जागांसाठी तब्बल १,८०६ उमेदवारांनी २,३३५ उमेदवारी अर्ज दाखल केले असून, आज गुरुवारी (दि.२२) सकाळी ११ वाजल्यापासून उमेदवारी अर्जांची छाननी सुरू झाली आहे.
१६ ते २१ जानेवारीदरम्यान अर्ज प्रक्रिया
पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ गट आणि पंचायत समित्यांच्या १४६ गण अशा एकूण २१९ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया दि.१६ जानेवारीपासून सुरू झाली होती, तर बुधवार दि.२१ जानेवारी हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.
प्रारंभीच्या तीन दिवसांत अवघ्या ५८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, मात्र शेवटच्या तीन दिवसांत इच्छुकांची प्रचंड झुंबड उडाल्याने अर्ज संख्येत मोठी वाढ झाली.
चार वर्षांनंतर झेडपी–पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारांची गर्दी; २१९ जागांसाठी २,३३५ अर्ज दाखल
■ अर्जांची सविस्तर आकडेवारी
▪️ जिल्हा परिषद – ७३ जागा
● ८५३ उमेदवारी अर्ज
● ६४१ उमेदवारांकडून दाखल
■ पंचायत समित्या – १४६ जागा
● १,४८२ उमेदवारी अर्ज
● १,१६५ उमेदवारांकडून दाखल
■ पुरुष – महिला उमेदवारांचे प्रमाण
● जिल्हा परिषद गट
● पुरुष : ३७४
● महिला : २६७
■ पंचायत समिती गण
● पुरुष : ६४४
● महिला : ५२१
ही माहिती जिल्हा परिषद निवडणूक जिल्हा समन्वयक व रोजगार हमी योजना विभागाच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळाली आहे.
■ तालुकानिहाय स्थिती
पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यात सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले, तर वेल्हे तालुक्यात सर्वात कमी अर्ज दाखल झाल्याचे समोर आले आहे.
■ निवडणूक कार्यालयात रात्री उशिरापर्यंत काम
अर्ज दाखल करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस असल्याने प्रत्येक तालुक्यात उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती. काही तालुक्यांत एका दिवसात ३०० हून अधिक अर्ज दाखल झाल्याने त्याची माहिती संकलित करून निवडणूक आयोगाला पाठवण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयातील कर्मचारी रात्री दोन वाजेपर्यंत काम करत होते. परिणामी अनेक कर्मचारी रात्री तीनच्या सुमारास घरी परतले.
दरम्यान, आजपासून सुरू झालेल्या उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेकडे सर्व राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















