पिंपरी / प्रतिनिधी : दि. २६ नोव्हेंबर २०२५ दापोडी परिसरात येत्या २९ नोव्हेंबर रोजी आयोजित केले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाआरोग्य शिबिर हे आरोग्यसेवेचा “महाकुंभमेळा” ठरणार आहे. दुर्गाताई निरंजन ठोकळ व सनराईस मेडिकल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील नामांकित रुग्णालये, तज्ज्ञ डॉक्टर्स आणि विविध वैद्यकीय संस्था या शिबिरात सहभागी होणार आहेत.
मोफत तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रिया
या महाशिबिरात नागरिकांसाठी जवळपास सर्व प्रकारच्या तपासण्या, उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत उपलब्ध असणार आहेत.
विशेष वैशिष्ट्ये :
महिलांसाठी ८७ रक्त तपासण्या मोफत
जर्मन टेक्नॉलॉजी मशीनद्वारे ३८ आजारांचे रक्त परीक्षण पूर्णतः मोफत (बाहेर सुमारे ₹15,000 खर्च येणाऱ्या चाचण्या)
गुडघा व मणका आजारांसाठी विना शस्त्रक्रिया मोफत उपचार
दिव्यांगांसाठी विशेष सुविधा
मोफत इलेक्ट्रिक बायसिकल
श्रवणयंत्र, चष्मे, औषधे वाटप
व्हीलचेअर, वॉकिंग स्टिक, वॉकर्स, जयपूर फुट, कॅलिपर्स
शिबिरातच दिव्यांग प्रमाणपत्र व UDID कार्ड वितरण
मोफत उच्चस्तरीय वैद्यकीय सेवा
शिबिरात खालील तपासण्या व शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जाणार आहेत:
हृदय शस्त्रक्रिया, प्रत्यारोपण
किडनी विकार व प्रत्यारोपण
ओठ व टाळूवरील जन्मजात विकृती शस्त्रक्रिया
कॅन्सर निदान, शस्त्रक्रिया व केमोथेरपी
बालशस्त्रक्रिया, मेंदू शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी
गुडघा व हिप प्रत्यारोपण
मोफत एमआरआय, सीटी स्कॅन, अँजिओग्राफी
स्त्रीरोग, नेत्ररोग, दंतरोग, आयुर्वेद, योगा, न्युरोपॅथी
कॉक्लियर इम्प्लांट, हिमोग्लोबीन तपासणी इत्यादी अनेक सेवा
सहभागी रुग्णालये व संस्थांचा भव्य सहभाग
रुबी हॉल क्लिनिक, संचेती हॉस्पिटल, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल, इंद्रायणी हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, सिंहगड डेंटल कॉलेज, व्हिजन नेक्स्ट फाउंडेशन, Knee Veda, Wellness Nutrition Center, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आदी मान्यवर संस्था या शिबिरात सहभागी होणार आहेत.
नागरिकांसाठी आवश्यक सूचना
शिबिरात येताना खालील कागदपत्रे अनिवार्य :
आधार कार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स / रेशन कार्ड
तसेच पूर्वीचे वैद्यकीय कागदपत्रे किंवा रिपोर्ट असल्यास ते सोबत आणावेत.
दापोडी परिसरातील अधिकाधिक नागरिकांनी या अभूतपूर्व महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक दुर्गाताई निरंजन ठोकळ यांनी केले आहे.
शिबिराबाबत अधिक माहितीसाठी संपर्क : ७७६८००३५३५

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏














