हरीश शर्मा – मुख्य संपादक पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायती यांच्यासाठीचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुका डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पार पडणार असून, राज्यभरात राजकीय वातावरण तापले आहे.
या कार्यक्रमानुसार —
उमेदवारी अर्ज दाखल : १० ते १७ नोव्हेंबर २०२५
अर्ज छाननी : १८ नोव्हेंबर २०२५
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : २१ नोव्हेंबर २०२५
चिन्ह वाटप : २६ नोव्हेंबर २०२५ मतदानाचा दिवस : २ डिसेंबर २०२५
मतमोजणी व निकाल : ३ डिसेंबर २०२५
राज्यातील या निवडणुका स्थानिक स्तरावरील राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. प्रत्येक पक्षासाठी ही निवडणूक आगामी महापालिका निवडणुकांचे राजकीय समीकरण तपासण्याची संधी ठरणार आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चिती, प्रचार योजना आणि जनसंपर्क मोहीम यांची तयारी सुरू केली आहे.
स्थानिक प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, कर आकारणी आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न या निवडणुकांमध्ये प्रमुख ठरण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसांत राज्यभर राजकीय हालचालींना वेग येणार असून, नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये कोणाचा झेंडा फडकतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















