पुणे (दि. २७ ऑक्टोबर) — मुळारोड भागातील मुख्य चौकातील मध्य भागातील कठडा फुटून त्याची वाळू, खडी, विटा रस्त्यावर पडल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. मुंबई कडून सोलापूर कडे जाणारी अवजड वाहने या सर्कल ला वळसा घालून मार्गस्थ होत असतात तसेच दुचाकी वाहने वळण घेताना घसरत असून लहानमोठे अपघात होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात येत्या ८ दिवसांत कठडा दुरुस्त करून परिसर सुशोभित करावा, तसेच पडलेली वाळू, खडी, विटा आणि राडारोडा तातडीने बाजूला करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात असेही नमूद करण्यात आले की, ८ दिवसांच्या आत काम न झाल्यास होणाऱ्या अपघातास जबाबदार महापालिका प्रशासन राहील.”
या वेळी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास भगवानराव निम्हण, निलेश जुनवणे, गोकुळ अडागळे, मिलन भोरडे, आकाश धेंडे, शंकर पवार, गोकुळ पवार, ओंकार सोरटे, ओंकार कुंभार, किशोर इंगवले तसेच इतर मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















