पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live खडकी / प्रतिनिधी : दि. २४ ऑक्टोबर : दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या उत्सवी पर्वाचे औचित्य साधत दि. २२ ऑक्टोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खडकी परिसरात कष्टकरी महिला, माता-भगिनी आणि सफाई कर्मचारी यांना दिवाळी भेटवस्तू देऊन आनंद साजरा करण्यात आला.
या उपक्रमात महिलांना साड्या, मिठाई, दिवाळी किट तसेच दिवाळी उपयुक्त साहित्य वाटप करण्यात आले. समाजातील स्वच्छता राखणारे हे कर्मचारी आपले कर्तव्य जीवाची पर्वा न करता पार पाडतात, ही बाब कौतुकास्पद असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष विजय जाधव आणि शहर सरचिटणीस अमित जावीर यांच्या वतीने करण्यात आले होते. या प्रसंगी खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक विक्रमसिंह कदम यांच्या हस्ते कष्टकरी महिलांना दिवाळी भेटवस्तू देत भाऊबीज साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला मतदारसंघाचे उपाध्यक्ष प्रदीप चोपडे, उपाध्यक्ष धनंजय जवळेकर, संघटक सचिव आनंद चव्हाण, युवक शहर सरचिटणीस आकाश केंगार, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी अंगरे, वणवर्धिनी फाउंडेशनचे अध्यक्ष विजय ढोणे, धनंजय जगताप, तसेच महिला अध्यक्ष नुतन गायकवाड, महिला उपाध्यक्ष शारदा सोडी, शीला भालेराव आणि इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
दिवाळी आणि भाऊबीज साजरी करताना सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकत होता. समाजातील या मेहनती भगिनींना दिलेली ही सप्रेम भेट त्यांच्या आयुष्यात आनंदाची आणि उत्साहाची झुळूक ठरली.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏














