पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
पिंपरी / प्रतिनिधी : दि. २१ ऑक्टोबर साई सोशल & स्पोर्ट्स फाउंडेशन
मास्टर माईंड ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, NHRACF, बुधाणी वेफर्स, आणि अमर कुटे यांच्या सहकार्याने स्नेहवन आश्रम आणि दिघी झोपडपट्टी भागातील गरजू लोकांसाठी चादरी, साड्या, मिठाई बॉक्सेस आणि स्नॅक्स वाटप करण्यात आले.
एकूण २६५ व्यक्तींना लाभ मिळाला, ज्यात आश्रमातील मुले आणि झोपडपट्टीतील लोकांचा समावेश होता.
याप्रसंगी पारूल गुप्ता , लीना बोऱ्हाडे , कमलेश स्वामी, फिरोज खान, डॉ. प्रदीपा नायर, तसेच शिक्षक शिक्षिका श्रेया चव्हाण, शीला शर्मा, अर्चना कुलकर्णी, मीनाक्षी नाईक, दीपती वालके उपस्थित होते.
सर्व स्वयंसेवक आणि सहकाऱ्यांचे साई सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष फिरोज खान यांनी ज्यांनी गरजू लोकांच्या दिवाळीला उजळवले त्या सर्वांचे आभार मानले.
“दिवाळीचा खरा आनंद तेव्हाच आहे, जेव्हा आपण दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणतो. या सामाजिक वाटचालीत सर्व सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत” – फिरोज खान

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















