Homeक्राईमपुण्यात महिलांच्या बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढले

पुण्यात महिलांच्या बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढले

पुणे पीसीएमसी न्यूज 24: पुणे :

पुणे: अलीकडच्या काळात पुणे शहरात महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारे पुणे आता गुन्ह्यांच्या शहराकडे वाटचाल करत असल्याची भीती निर्माण झाली आहे.

अत्यंत धक्कादायक घटना म्हणजे नुकतीच घडलेली एक घटना  वाघोली परिसरातील 24 वर्षीय पूजा खंबाट ही महिला, अवघ्या 9 दिवसांच्या बाळाला सोडून घरातून बेपत्ता झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती घर सोडून जाताना दिसली आहे, परंतु तिचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे तिची नुकतीच सिझेरियन डिलिव्हरी झाली असून टाके देखील पूर्णपणे भरलेले नाहीत.

ही केवळ एक घटना नाही. मिळालेल्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये पुणे जिल्ह्यातून तब्बल 840 महिला गायब झाल्या होत्या. 2024 मध्ये अल्पवयीन मुली, तरुण आणि तरुणी बेपत्ता होण्याच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. महिलांच्या बेपत्ता होण्यामागची कारणं पोलीस आणि समाजशास्त्रज्ञांच्या मते, बेपत्ता होणाऱ्या महिला व मुलींचा वयोगट साधारणतः 16 ते 25 वर्षे आहे.
• घरातील सतत होणारी भांडणं
• रुढी-परंपरांचा दबाव
• नोकरी करण्याची इच्छा
• स्वतःची ओळख निर्माण करण्याची धडपड
यामुळे अनेक मुली घर सोडण्याचा निर्णय घेतात. तर काही प्रकरणांत अपहरण आणि मानवी तस्करीसुद्धा झाल्याचे उघड झाले आहे

बोपोडी येथील डॉ. फरहा अन्वर हुसैन शेख, अध्यक्षा – मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशन, यांनी या गंभीर परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “महिलांची सुरक्षितता ही केवळ कायद्याचा विषय नाही तर समाजाच्या मानसिकतेचाही मुद्दा आहे. घर, समाज आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण मिळालं पाहिजे. पोलिसांनी या प्रकरणांवर अधिक तत्परतेने काम करणे आवश्यक आहे. आम्ही या मुद्द्यावर जनजागृती आणि कायदेशीर मदत करण्यासाठी पुढाकार घेऊ.”

समाज आणि प्रशासनाला आवाहन
• प्रत्येक कुटुंबाने आपल्या मुलींना विश्वास, समजूत आणि आधार द्यावा
• पोलीस यंत्रणेने तक्रारींवर त्वरित कारवाई करावी
• सामाजिक संस्थांनी महिला सक्षमीकरण आणि सुरक्षिततेसाठी पुढाकार घ्यावा

महिलांच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन, पोलीस, सामाजिक संस्था आणि कुटुंबीय यांची एकत्रित जबाबदारी आहे असे ही डॉ. फरहा यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!