पुण्यात १२ इनर व्हील क्लब्सकडून भव्य जनजागृती अभियान
पुणे | प्रतिनिधी : दि. 3 फेब्रुवारी 2026 अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात युवकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी पुण्यात प्रभावी पाऊल उचलण्यात आले. २ फेब्रुवारी रोजी पुण्यातील मॉडर्न कॉलेज, गणेशखिंड येथे आयोजित युवक महोत्सवात पुणे शहरातील १२ इनर व्हील क्लब्सच्या संयुक्त विद्यमाने VIVIDAA या व्यासपीठावर भव्य अमली पदार्थविरोधी जनजागृती अभियान राबविण्यात आले.
या अभियानात प्रभावी फलक, माहितीपूर्ण पोस्टर्स, ठोस घोषवाक्ये तसेच संवादात्मक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. इनर व्हील क्लबच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत व्यसनमुक्त, सकारात्मक आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले.
या उपक्रमाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक विद्यार्थ्यांनी इनर व्हीलच्या सदस्यांसोबत एकत्र येत अमली पदार्थांविरोधात जोरदार घोषणा दिल्या. “Say No to Drugs” अशी सामूहिक प्रतिज्ञा घेत युवकांनी स्वतः पुढाकार घेत समाजातील या गंभीर समस्येविरोधात जबाबदारी स्वीकारण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
या जनजागृती उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली. युवकांच्या सक्रिय सहभागातून साकारलेला हा उपक्रम केवळ जनजागृतीपुरता मर्यादित न राहता युवकप्रेरित सामाजिक चळवळीचे स्वरूप घेणारा ठरला. इनर व्हील क्लब्सच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आणि अनुकरणीय ठरत आहे.
या उपक्रमात सहभागी इनर व्हील क्लब्स :
पुणे डाऊनटाउन, पुणे विंग्ज, निगडी प्राईड, IWC पुणे, पुणे इम्पिरियल, पुणे अपटाउन, पुणे प्लॅटिनम, बाणेर हिल्स, पूना नॉर्थ, पुणे रिव्हर रिदम, पुणे रिव्हरसाईड आणि पुणे सेंट्रल. Pune Genz

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏













