खडकी / प्रतिनिधी : दिनांक ७ डिसेंबर २०२५ वंदेमातरम गीताच्या निर्मितीला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने, वंदेमातरम संघटना खडकी विभाग च्या वतीने भव्य वंदेमातरम गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत एस व्ही एस शाळेने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेत खडकी परिसरातील नऊ शाळांमधील एकूण २२० विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धा सोलो गायन आणि समूहगान या दोन प्रकारांत घेण्यात आली.


समूहगान निकाल
प्रथम : एस व्ही एस शाळा
द्वितीय : जी. एम. आय. कन्या शाळा
तृतीय : लोकमान्य टिळक हायस्कूल

स्पर्धेचे उद्घाटन लालबहादूर शास्त्री हायस्कूलचे मुख्याध्यापक. कवाद सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून वंदेमातरम गीताचे जनक बंकीमचंद्र चटर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. सुप्रसिद्ध गायक निलेश पोत्रे यांनी महाराष्ट्र गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.
विद्यार्थ्यांच्या देशभक्तीने परिपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण ऑडिटोरियमचा माहोल भारावून गेला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे प्रांत अध्यक्ष विकास हांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रांत कार्याध्यक्ष राजेश शर्मा, ऍड. इंद्रकुमार बन्सल, शरद रोच आदी मान्यवर उपस्थित होते.
परीक्षक म्हणून अविनाश लोंढे, आनंद काजुळकर निवृत्त पोलीस निरीक्षक आणि हरी देवनेसन यांनी काम पाहिले. प्रास्ताविक शिरीष रोच, सूत्रसंचालन राजेश काकडे, तर निवेदन सागर आठवाल यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद काळे, विजय आठवाल, किशोर भोरे, करण चव्हाण, सोनी आठवाल यांनी विशेष परिश्रम घेतले.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏













