Homeखडकीवंदे मातरम संघटना खडकी विभाग तर्फे खडकीत 23 मार्च रोजी भव्य रक्तदान...

वंदे मातरम संघटना खडकी विभाग तर्फे खडकीत 23 मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिर

खडकी कॅन्टोन्मेंट | प्रतिनिधी :  दि. 21 मार्च 2026  वंदे मातरम् संघटना खडकी विभाग च्या  वतीने सालाबादप्रमाणे यंदाही 23 मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या 95 व्या बलिदान दिनानिमित्त, तसेच संघटनेच्या 43 व्या वर्धापन दिनानिमित्त आणि ‘वंदे मातरम्’ गीत निर्मितीच्या 150 व्या वर्षानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सदर रक्तदान शिबिर सोमवार, दिनांक 23 मार्च 2026 रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत आझाद मित्र मंडळ, लक्का वाडा, घोरपडे मैदान शेजारी, खडकी, पुणे येथे पार पडणार आहे.
गेल्या 43 वर्षांपासून वंदे मातरम् संघटना समाजोपयोगी उपक्रम राबवत असून, प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजसेवेची परंपरा जपली आहे. कोरोना महामारीसारख्या कठीण परिस्थितीतही नियमांचे पालन करत शिबिर आयोजित करून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे कार्य अखंड सुरू ठेवले आहे.
संघटनेतर्फे नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “रक्तदान हेच जीवनदान” या संदेशातून एका थेंब रक्तामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात, अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे.
शहीदांनी देशासाठी प्राण अर्पण केले, त्याचप्रमाणे नागरिकांनी रक्तदान करून समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या शिबिरात सहभागी होऊन गरजू रुग्णांना नवीन जीवन देण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
रक्तदान विषयी संपर्कासाठी :
राजेश शर्मा – 9881546916
शिरीष रोच – 9822816441
राजेश काकडे – 9766166661
राजेश राजपूत – 9960363968

“शहीदांनी रक्त दिलं देशासाठी… आता आपण रक्त देऊया माणुसकीसाठी!”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अनिल अनंतराव पाराशर यांची विश्व सनातन हिंदू फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश संगठन मंत्रीपदी नियुक्ती

धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याला नवे बळ – राज्यभर संघटन विस्ताराची जबाबदारी पुणे | प्रतिनिधी : दि. 23 मार्च 2026:           ...

येरवडा ओपन जेलमध्ये आत्मनिर्भरतेचा नवा उपक्रम; इनरव्हील क्लबकडून ऊस रस मशीनची भेट

कैद्यांच्या पुनर्वसनाला चालना , ‘श्रुंखला उपहारगृह’ला मिळणार नवा उत्पन्नाचा स्त्रोत पुणे | प्रतिनिधी :  दि. 21 मार्च 2026 समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डिस्ट्रिक्ट 313...

ईद-उल-फितर 21 मार्चला साजरी; पुणे- पिंपरी चिंचवड मध्ये नमाज वेळापत्रक जाहीर, महिलांसाठी विशेष व्यवस्था

रमजानचा चंद्र न दिसल्याने शनिवारी ईद; मशिदींमध्ये सकाळी 7 ते 11 दरम्यान नमाज – पोलिसांकडून वाहतूक बदलांची तयारी बोपोडी  | प्रतिनिधी :  दि. 20 मार्च...

आंबेडकर जयंतीतील गुन्ह्यांवरून वाद पेटला; उपमहापौर वाडेकरांची सरकारला थेट मागणी

२०१६ ते २०२४ मधील प्रकरणे प्रलंबित; इतर उत्सवांना सवलत, मग आंबेडकरी कार्यकर्त्यांना का नाही? बोपोडी | प्रतिनिधी :  दि. १८ मार्च २०२६      आंबेडकर...

क्लासवरून परतणाऱ्या दहा वर्षीय अल्पवयीन मुलीला अडवून हात पकडला; प्रेमाची जबरदस्ती करणाऱ्या तरुणाविरुद्ध तक्रार

एक्झरबीया, हिंजवडी हिल्स फेज 2 ) सोसायटी नेरे दत्तवाडी परिसरातील धक्कादायक प्रकार; पाठलाग करून मोबाईल नंबर व ओळख मागितल्याचा आरोप हिंजवडी | प्रतिनिधी : दि....

error: Content is protected !!