पुणे कॅम्प / प्रतिनिधी : दि. 4 नोव्हेंबर लष्कर परिसरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून कमी दाबाने आणि अनियोजित पद्धतीने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने नागरिकांच्या सह्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
आज या मोहिमेदरम्यान नागरिकांकडून गोळा केलेल्या सह्यांचा मोठा बॅनर लष्कर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना भेट देऊन सादर करण्यात आला. त्यानंतर हा बॅनर विभागाच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला. यावेळी मनसेच्या प्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन मनसे कार्यकर्त्यांना दिले.
या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आतिश कुहाडे, प्रशांत मते, भूप्रेद शेंडगे, संजय भोसले, दीपक कुहाडे, कुणाल करोते, अविनाश वाघमारे, श्रीनिवास कांबळे, अक्षय परदेशी, अक्षय वाघेला तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर बातमी youtub वर पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करा.
https://youtu.be/yX4PuDVtWSA?si=3i8M0OGJlBS6Bqw9

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















