रोजगार, महिला सुरक्षा व शेतकरी प्रश्नांवर संताप; श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात तीव्र आंदोलन
पुणे | प्रतिनिधी : दि. ३ मार्च २०२६
होळीच्या उत्सवी वातावरणात पुण्यात राजकीय रंग चढलेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महायुती सरकारच्या विविध निर्णयांविरोधात ‘भ्रष्टाचाराची होळी’ करण्यात आली.
प्रभारी पुणे शहर अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यालयासमोर सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे प्रतीकात्मक गोवऱ्यांचे दहन करण्यात आले. यावेळी केंद्र व राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला.
◆ “१२ वर्षांत उद्योगपतींनाच लाभ” – श्रीकांत पाटील
यावेळी बोलताना श्रीकांत पाटील यांनी आरोप केला की, केंद्र व राज्यात भाजप सरकार येऊन जवळपास १२ वर्षे उलटली असून या काळात उद्योगपतींच्या हिताचेच निर्णय घेण्यात आले. त्यामुळे तरुणांच्या हाताला रोजगार नाही. बेरोजगारीमुळे अनेक तरुण गुन्हेगारी व अंमली पदार्थांच्या आहारी जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांकडे लक्ष वेधत सरकार प्रभावी व कडक धोरण राबवत नसल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी आंदोलनात युवक अध्यक्ष किशोर कांबळे, महिला अध्यक्ष स्वाती पोकळे, रोहन पायगुडे, त्र्यंबक मोकाशी, स्वप्निल जोशी, हेमंत येवलेकर, मकरंद देशमुख, जयदीप देवकुळे, मधुकर भगत, राजेश बालवडकर, हर्षवर्धन दिघे, अमन बागवान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
एकूणच केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात प्रतीकात्मक ‘भ्रष्टाचाराची होळी’ करून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने तीव्र निषेध नोंदविला.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏






















