Homeपिंपरी चिंचवडपिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिळकतकर अभय योजना’ लागू करण्याची मागणी तानाजी बारणे यांचे पालिका आयुक्तांना...

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिळकतकर अभय योजना’ लागू करण्याची मागणी तानाजी बारणे यांचे पालिका आयुक्तांना निवेदन

थेरगाव / विशेष प्रतिनिधी : दि. २१ नोव्हेंबर :          पुणे महापालिकेने मिळकतकर थकबाकीदारांसाठी लागू केलेल्या ‘अभय योजने’च्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेतही तत्काळ अशीच योजना सुरू करावी, अशी मागणी युवा नेते तानाजी बारणे यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बारणे यांनी अलीकडेच आयुक्त हर्डीकर यांची भेट घेऊन मिळकतकर थकबाकी, त्यावरील दंड व वाढत्या वसुली समस्येबाबत सविस्तर चर्चा केली. पुणे महापालिकेच्या योजनेनुसार, १५ जानेवारीपर्यंत संपूर्ण थकबाकी भरल्यास थकबाकीवरील व्याजामध्ये तब्बल ७५ टक्के सूट मिळणार आहे. अशाच पद्धतीने पिंपरी-चिंचवडमध्येही योजना लागू झाल्यास हजारो थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळेल, असे बारणे यांनी स्पष्ट केले.

सध्या महानगरपालिकेकडून दरवर्षी थकबाकीदारांना नोटिसा पाठवल्या जातात. सलग काही वर्षे कर न भरल्यास संबंधित मालमत्तेची जप्ती व लिलाव करण्याची कारवाईही केली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत थकीत कर आणि व्याजाची रक्कम प्रचंड वाढल्याने वसुलीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे ‘अभय योजना’ राबवल्यास वसुली वाढण्यासोबतच नागरिकांना कर भरणे सुलभ होईल, असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला.
शहरासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरेल आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कर वसुली वेगाने होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. ही योजना लवकरात लवकर लागू करण्याची विनंतीही त्यांनी आयुक्तांना केली.
या प्रसंगी आबासाहेब ढवळे, हनुमंत बारणे, विजय राऊत, अतुल घोगरे, आप्पा साबळे, योगेश बालघरे, राजू पवार यांसह नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेरे-दत्तवाडीत कचऱ्याचे साम्राज्य; आठ दिवसांपासून कचरा गाडीच गायब!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात संताप नेरे दत्तवाडी (प्रतिनिधी): दि. 24 जुलै 2026 गेल्या आठ दिवसांपासून नेरे-दत्तवाडी परिसरात कचरा उचलणारी गाडी...

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; इन्स्टाग्राम रील स्पर्धेचेही आयोजन

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 जुलै 2026                      रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त...

नेरे गावात मा. सरपंच सचिनशेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रमांचा वर्षाव; ५०० शालेय गणवेश...

 सामाजिक बांधिलकीचा आदर्श; विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा  हिंजवडी | प्रतिनिधी : दि. 20 जुलै 2026             ...

Grow and Flourish’ थीमसह इनरव्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

महिला सक्षमीकरणाचा संदेश, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य; सुनंदा डेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल                         ...

चिखलीतील हातगाडी व स्टॉलधारकांवरील कारवाईबाबत काशिनाथ नखाते यांनी पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट

पिंपरी | प्रतिनिधी : दि. 17 जुलै 2026                  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून चिखली कार्यक्षेत्रातील हातगाडी, स्टॉलधारक आणि रस्त्यावर...

error: Content is protected !!