विलीनीकरण करणार पण चटई निर्देशांक वाढवून मिळणार का ?#
#निर्णयाचे स्वागत पण अनेक प्रश्नांवर प्रश्नचिन्ह च#
पुणे पीसीएमसी न्यूज : खडकी / बातमीदार

राज्यातील कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नागरी परिसर जवळच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत विलीनीकरण करण्याच्या प्रक्रियेला राज्य सरकारने तत्वतः मान्यता दिली कॅन्टोन्मेंट परिसरातील राहिवाश्याना विलीनीकरणामुळे राज्य सरकारच्या मूलभूत सुविधा मिळतील पण वाढीव एफएसआय ( चटई निर्देशांक) मिळणार किंवा नाही या संभ्रमामुळे खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीतील राहिवाश्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. तसेच अनेक प्रश्नांचा खुलासा होईपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीतील राहिवाश्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. या प्रश्नांची उत्तरे राज्य सरकारकडून कधी मिळतील याकडेच सध्यातरी सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील देहूरोड कॅन्टोन्मेंट वगळता पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट महापालिकेत विलीन करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली. कॅन्टोन्मेंट मधील लष्कर परिसर वगळता उर्वरित नागरी (सिविल) भाग हा महापालिकेत विलीन होणार आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट मधील रहिवाश्याना शाळा , हॉस्पिटल, स्मशान भूमी इत्यादी कॅन्टोन्मेंट च्या इमारती मिळकती महापालिकेला मिळणार असून येथील राहिवाश्याना राज्य शासनाच्या व महापालिकेच्या योजना मिळणार जे की यापूर्वी त्या मिळत नव्हत्या. तसेच खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीतच संरक्षण विभागाचे दारुगोळा कारखाना व इतर संवेदनशील संस्था असल्या मुळे एफएसआय चा प्रश्न हा सरकार कसा सोडवणार हा मुख्य प्रश्न विलीकरणाच्या आड येत आहे त्यामुळे नागरिकांना सध्या जेवढा एफएसआय आहे तेवढाच मिळत असल्यामुळे ठोस निर्णय झाला नसल्यामुळे वाढीव बांधकाम करता येणार नाही सद्यस्थितीतील बांधकामे फक्त दुरुस्त करता येतील.
चौकट
— राज्य सरकारने खडकी कॅन्टोन्मेंट महापालिकेत विलीन कररण्याची घोषणा केली मात्र एफएसआय वाढवून देणार की नाही यावर कोणतेच भाष्य किंवा सूचना नाही एफएसआय वाढवून नाही मिळाला तर आमच्या कॅन्टोन्मेंट मधील रहिवाश्यांचे साधारण पाच पट टॅक्स वाढू शकतो तसेच खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीतील झोपडपट्टी पुनर्वसन एसआरए स्कीम मिळणार का ? याचे सरकारने स्पष्टीकरण करावे तयानंतरच विलीनीकरण करावे.
— मनीष आनंद – माजी उपाध्यक्ष ,खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड.
–खडकी कॅन्टोन्मेंट महापालिकेत विलीन करण्याच्या घोषणेचे सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे आभार त्यांच्या निर्णयाचे स्वागत मात्र कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरीकांवर जाचक अटी न लावता नागरिकांच्या हिताला प्राधान्य द्यावे. तसेच कॅन्टोन्मेंट हद्दीमधील नागरी वसाहत तसेच काही लष्कराच्या मोकळ्या जागा मैदाने आहेत त्या मिळकतीही महापालिकेने घेऊन त्याठिकाणी सार्वजनिक सोयीसुविधा वाढवून द्याव्या. तसेच खडकीत असलेल्या झोपडपट्टयांचे एसआरए द्वारे पुनर्वसन करावे ही सर्व खडकी करांच्या वतीने मागणी करीत आहे.
–अभय सावंत – नामनिर्देशित सदस्य , खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड.
–खडकी कॅन्टोन्मेंट महापालिकेत विलीन होणार ही आनंदाची बाब आहे , कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सद्याच्या ब्रिटिश कालीन जाचक अटी असल्यामुळे नागरिकांना कोणतेच लाभ मिळत नव्हते महापालिकेत गेल्यामुळे लाभ मिळतील. मात्र सरकारने एफएसआय वाढवून दिला पाहिजे तेव्हाच खडकी डेव्हलप होईल नाही तर पुन्हा ‘ ‘जैसे थे ‘ अशीच परिस्तिथी राहील .
— तुषार गांधी – अध्यक्ष – खडकी व्यापारी असोसिएशन