Homeपुणेसुस खिंडीतील रस्त्यावर पसरलेली खडी तातडीने हटवावी; अन्यथा मनसेचे रास्तारोको आंदोलन

सुस खिंडीतील रस्त्यावर पसरलेली खडी तातडीने हटवावी; अन्यथा मनसेचे रास्तारोको आंदोलन

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

औंध / प्रतिनिधी : दि. १४ ऑक्टोबर
सुस येथील महामार्गावरील पुलावरून पाषाणकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या महिनाभरापासून मोठ्या प्रमाणात खडी पसरलेली असून, या खडीमुळे दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. विशेषतः पुलावरून उतरताना तीव्र उतार असल्याने वाहनांचा तोल जाऊन गंभीर अपघाताची शक्यता वाढली आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, “या ठिकाणी खडी पसरलेली असून दिवसाढवळ्या दोन ते तीन अपघात होत आहेत. रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिक धोकादायक बनते.” रविवार १२ ऑक्टोबर रात्री देखील एका युवकाची ऍक्टिवा दुचाकी घसरून अपघात झाला. सुदैवाने त्या युवकाला गंभीर दुखापत झाली नाही.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे  सोमवार, दि. १३ ऑक्टोबर  ला  पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात “चोवीस तासांच्या आत खडी हटवली नाही, तर मनसे स्टाईल रास्तारोको आंदोलन करण्यात येईल” असा इशारा देण्यात आला आहे. तसेच होणाऱ्या संभाव्य अपघातांसाठी महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण छत्रपती शिवाजीनगर कोथरूड विभाग, तसेच पांडुरंग सुतार, अजय नेवसे, शिवम दळवी, प्रेमनाथ उमाप, संदीप काळे, योगेश शिंदे आणि किशोर इंगवले उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ज्येष्ठ पत्रकार अनंत तुकाराम पवार यांना मिळाला आधार – तरुण मिश्रा यांच्या एनजीओकडून मदतीचा...

हरीश शर्मा | पुणे पीसीएमसी न्यूज नेटवर्क :            दि. 28 मार्च 2026               ...

पुणे महापालिकेत मीडियावर गंडांतर? महापौर मंजुषा नागपुरे यांच्या निर्णयावरून वाद; पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न

हरीश शर्मा | पुणे पीसीएमसी न्यूज नेटवर्क - दि.  25 मार्च 2026 पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रवेशावर मर्यादा आणण्याचा निर्णय महापौर मंजुषा...

खडकीत शहीदांना अभिवादन; वंदेमातरम संघटनेचे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

खडकी कॅन्टोन्मेंट | प्रतिनिधी : दि.  24 मार्च 2026 देशासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणारे शहीद भगत सिंह, सुखदेव  आणि राजगुरू यांच्या 95 व्या...

अनिल अनंतराव पाराशर यांची विश्व सनातन हिंदू फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश संगठन मंत्रीपदी नियुक्ती

धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याला नवे बळ – राज्यभर संघटन विस्ताराची जबाबदारी पुणे | प्रतिनिधी : दि. 23 मार्च 2026:           ...

येरवडा ओपन जेलमध्ये आत्मनिर्भरतेचा नवा उपक्रम; इनरव्हील क्लबकडून ऊस रस मशीनची भेट

कैद्यांच्या पुनर्वसनाला चालना , ‘श्रुंखला उपहारगृह’ला मिळणार नवा उत्पन्नाचा स्त्रोत पुणे | प्रतिनिधी :  दि. 21 मार्च 2026 समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डिस्ट्रिक्ट 313...

error: Content is protected !!