हरीश शर्मा | पुणे पीसीएमसी न्यूज नेटवर्क : दि. 28 मार्च 2026 पत्रकारितेच्या क्षेत्रात आयुष्य घालवलेल्या ज्येष्ठ पत्रकार अनंत तुकाराम पवार यांची सध्या अत्यंत हलाखीची परिस्थिती समोर आली होती. पूर्वी नेरळ परिसरात एका नामांकित वृत्तपत्रात काम करणारे पवार आज निराधार अवस्थेत जीवन जगत असल्याची माहिती समोर आल्यानंतर समाजातील संवेदनशील घटक पुढे सरसावले आहेत.


दरम्यान, सामाजिक कार्यात सक्रिय असलेले तरुण मिश्रा यांनी आपल्या एनजीओच्या माध्यमातून पवार यांना मदतीचा हात दिला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये मिश्रा यांनी स्वतः पवार यांना आपल्या संस्थेमध्ये नेऊन त्यांची काळजी घेतल्याचे दिसून येते.
या व्हिडिओमुळे पवार यांच्या परिस्थितीकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले असून, समाजातून सहानुभूतीची लाट उसळली आहे. एका काळी समाजासाठी लेखणी चालवणारा पत्रकार आज मदतीच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
मदतीचे आवाहन
सामाजिक संस्थांसह प्रशासनानेही पुढाकार घेऊन अशा ज्येष्ठ पत्रकारांना मदत करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तसेच इच्छुक नागरिकांनीही पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
“ज्यांनी समाजासाठी आयुष्यभर आवाज उठवला, आज त्यांच्यासाठी समाजाने पुढे येण्याची वेळ आली आहे.”
नोट:- सोशल मीडिया व्हायरल न्यूज ( तरुण मिश्रा . फेसबुक पेज वरून जनहितार्थ प्रकाशित)

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏

















