Homeखडकीखडकी बाजारातील व्यायामशाळा वाद : बोर्डाच्या पत्रातील तारखेची चूक दिशाभूल की दुर्लक्ष...

खडकी बाजारातील व्यायामशाळा वाद : बोर्डाच्या पत्रातील तारखेची चूक दिशाभूल की दुर्लक्ष ?

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

खडकी / प्रतिनिधी: सामाजिक कार्यकर्ते शहाबाज सय्यद यांनी खडकी बाजार येथील लाल बहादूर शास्त्री शाळेच्या आवारात असलेल्या बोर्डाच्या स्व. सुरेश हेमराज गांधी व्यायामशाळा मित्रसागर मंडळ ट्रस्टमध्ये सुरू असलेल्या खाजगी जिम व फिटनेस क्लासेस संदर्भात  तक्रार खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे केली होती.
सय्यद यांनी तक्रारीत नमूद केले की, सार्वजनिक उपयोगासाठी असलेली ही जागा खासगी व्यावसायिक उपक्रमांसाठी वापरली जात असून, हे सरळसरळ नियमांचे उल्लंघन आहे. मात्र या तक्रारीवर बोर्डाने दीर्घकाळ काहीच प्रतिसाद दिला नाही.

यानंतर शहाबाज सय्यद यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी मिनाक्षी लोहिया यांची कार्यालयात भेट घेऊन आपल्या अर्जावर झालेल्या कारवाईबाबत विचारणा केली. “जर तुम्ही कारवाई करणार नसाल तर मी न्यायालयात जाणार,” असा इशारा सय्यद यांनी दिला. त्यावर लोहिया यांनी संबंधितांना शो कॉज नोटीस दिल्याचे सांगत “तुमच्या अर्जाची दखल घेतली आहे” असे स्पष्ट केले.
यानंतर बोर्डाकडून सय्यद यांना अधिकृत पत्राद्वारे “संबंधितांना नोटीस दिली आहे” अशी माहिती देण्यात आली. मात्र या पत्रात दिलेल्या रेफरन्समधील तारखेमध्ये गंभीर चूक झाल्याचे सय्यद यांच्या लक्षात आले. पत्रात त्यांच्या अर्जाची तारीख 25/08/2025 ऐवजी 25/08/205 अशी नमूद करण्यात आली होती.
ही टंक त्रुटी आहे की जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न — असा प्रश्न सय्यद यांनी उपस्थित केला आहे.
“ही चूक साधी नाही, तर प्रशासनातील निष्काळजीपणाचे द्योतक आहे. मी याबाबत पुढील कायदेशीर पाऊल उचलणार आहे,” असे सय्यद यांनी पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live शी बोलताना सांगितले.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून मात्र या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ज्येष्ठ पत्रकार अनंत तुकाराम पवार यांना मिळाला आधार – तरुण मिश्रा यांच्या एनजीओकडून मदतीचा...

हरीश शर्मा | पुणे पीसीएमसी न्यूज नेटवर्क :            दि. 28 मार्च 2026               ...

पुणे महापालिकेत मीडियावर गंडांतर? महापौर मंजुषा नागपुरे यांच्या निर्णयावरून वाद; पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न

हरीश शर्मा | पुणे पीसीएमसी न्यूज नेटवर्क - दि.  25 मार्च 2026 पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रवेशावर मर्यादा आणण्याचा निर्णय महापौर मंजुषा...

खडकीत शहीदांना अभिवादन; वंदेमातरम संघटनेचे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

खडकी कॅन्टोन्मेंट | प्रतिनिधी : दि.  24 मार्च 2026 देशासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणारे शहीद भगत सिंह, सुखदेव  आणि राजगुरू यांच्या 95 व्या...

अनिल अनंतराव पाराशर यांची विश्व सनातन हिंदू फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश संगठन मंत्रीपदी नियुक्ती

धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याला नवे बळ – राज्यभर संघटन विस्ताराची जबाबदारी पुणे | प्रतिनिधी : दि. 23 मार्च 2026:           ...

येरवडा ओपन जेलमध्ये आत्मनिर्भरतेचा नवा उपक्रम; इनरव्हील क्लबकडून ऊस रस मशीनची भेट

कैद्यांच्या पुनर्वसनाला चालना , ‘श्रुंखला उपहारगृह’ला मिळणार नवा उत्पन्नाचा स्त्रोत पुणे | प्रतिनिधी :  दि. 21 मार्च 2026 समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डिस्ट्रिक्ट 313...

error: Content is protected !!