पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
मोहोळनगर येथे समाजसेवेचा सुंदर उपक्रम; गरजू कुटुंबियांना सणाच्या आनंदात सहभागी करून दिले – अध्यक्षा उज्ज्वला नवले यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम यशस्वी
हिंजवडी / प्रतिनिधी : दि. १७ ऑक्टोबर इनर व्हील क्लब ऑफ पुणे विंग्ज तर्फे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मोहोळनगर (ता. मुळशी) येथील कातकरी समाजातील गरजू कुटुंबियांना दिवाळी फराळ, साड्या आणि जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश गरजू कुटुंबियांना सणाचा आनंद अनुभवता यावा, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे हास्य फुलावे हा होता.
या कार्यक्रमात क्लबच्या अध्यक्षा उज्ज्वला नवले, सचिव सुविधा, तसेच देवयानी, गौरी, सुनिता, डॉ. मीनाक्षी आणि मैथिली यांनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला आणि समाजसेवेचा उत्कृष्ट आदर्श घालून दिला. कार्यक्रमात विविध प्रकारचा दिवाळी फराळ, साड्या आणि दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तूंचा समावेश होता. कार्यक्रमाचे नियोजन सुयोग्य पद्धतीने पार पडले. तेथील शिक्षक सुदाम पवार यांनी या उपक्रमात मोलाचे सहकार्य केले.
कातकरी कुटुंबीयांनी इनर व्हील क्लब ऑफ पुणे विंग्जच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमामुळे समाजात आपुलकी, सद्भावना आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.


मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏













