Homeपुणेयेरवडा ओपन जेलमध्ये आत्मनिर्भरतेचा नवा उपक्रम; इनरव्हील क्लबकडून ऊस रस मशीनची भेट

येरवडा ओपन जेलमध्ये आत्मनिर्भरतेचा नवा उपक्रम; इनरव्हील क्लबकडून ऊस रस मशीनची भेट

कैद्यांच्या पुनर्वसनाला चालना , ‘श्रुंखला उपहारगृह’ला मिळणार नवा उत्पन्नाचा स्त्रोत

पुणे | प्रतिनिधी :  दि. 21 मार्च 2026
समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डिस्ट्रिक्ट 313 मधील पुण्यातील विविध इनरव्हील क्लब्सच्या संयुक्त विद्यमाने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. इनर व्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनम, पुणे रिव्हर रिदम्स, रिव्हरसाईड, पुणे विंग्ज, बाणेर हिल्स, पुणे सेंट्रल आणि पुणे इम्पिरियल यांच्या सहकार्याने येरवडा ओपन जेलमधील ‘श्रुंखला उपहारगृह’ या कॅन्टीनसाठी सुमारे 43,800 रुपयांची ऊस रस काढण्याची मशीन भेट देण्यात आली.

या उपक्रमासाठी श्रीमती सुषमा कोंडे आणि जेल अधीक्षक श्री शामकांत शेगडे यांचे विशेष सहकार्य लाभले. खुले कारागृहातील कैद्यांकडून चालवले जाणारे ‘श्रुंखला उपहारगृह’ हे केवळ कॅन्टीन नसून, कैद्यांच्या पुनर्वसनासाठी आणि आत्मविश्वास वाढीसाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरत आहे.
दररोज सुमारे 10,000 आयटी क्षेत्रातील कर्मचारी, शासकीय अधिकारी तसेच नागरिक या उपहारगृहाला भेट देतात. त्यामुळे कैद्यांना समाजाशी थेट संवाद साधण्याची आणि स्वतःची सकारात्मक ओळख निर्माण करण्याची संधी मिळते.

या प्रकल्पाचा मुख्य उद्देश कैद्यांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नवी संधी उपलब्ध करून देणे हा आहे. ऊस रस मशीनमुळे कॅन्टीनमध्ये नवीन उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होणार असून, त्यातून कैद्यांना व्यवसायिक कौशल्ये आत्मसात करता येणार आहेत. यामुळे त्यांच्या मनात कामाविषयीची जबाबदारी, आत्मविश्वास आणि स्वाभिमानाची भावना अधिक दृढ होणार आहे.
हा उपक्रम केवळ आर्थिक मदत नसून, कैद्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याचा एक प्रयत्न आहे. ‘बिहाइंड बार्स, बियॉन्ड लिमिट्स’ या संकल्पनेला साजेसा हा उपक्रम कैद्यांना नवजीवन देण्याचा आणि आत्मनिर्भरतेकडे नेण्याचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे. समाजात संवेदनशीलता आणि सहकार्याची भावना वाढवणारे असे उपक्रम निश्चितच परिवर्तनाचे नवे मार्ग दाखवत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अनिल अनंतराव पाराशर यांची विश्व सनातन हिंदू फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश संगठन मंत्रीपदी नियुक्ती

धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याला नवे बळ – राज्यभर संघटन विस्ताराची जबाबदारी पुणे | प्रतिनिधी : दि. 23 मार्च 2026:           ...

वंदे मातरम संघटना खडकी विभाग तर्फे खडकीत 23 मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिर

खडकी कॅन्टोन्मेंट | प्रतिनिधी :  दि. 21 मार्च 2026  वंदे मातरम् संघटना खडकी विभाग च्या  वतीने सालाबादप्रमाणे यंदाही 23 मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिराचे...

ईद-उल-फितर 21 मार्चला साजरी; पुणे- पिंपरी चिंचवड मध्ये नमाज वेळापत्रक जाहीर, महिलांसाठी विशेष व्यवस्था

रमजानचा चंद्र न दिसल्याने शनिवारी ईद; मशिदींमध्ये सकाळी 7 ते 11 दरम्यान नमाज – पोलिसांकडून वाहतूक बदलांची तयारी बोपोडी  | प्रतिनिधी :  दि. 20 मार्च...

आंबेडकर जयंतीतील गुन्ह्यांवरून वाद पेटला; उपमहापौर वाडेकरांची सरकारला थेट मागणी

२०१६ ते २०२४ मधील प्रकरणे प्रलंबित; इतर उत्सवांना सवलत, मग आंबेडकरी कार्यकर्त्यांना का नाही? बोपोडी | प्रतिनिधी :  दि. १८ मार्च २०२६      आंबेडकर...

क्लासवरून परतणाऱ्या दहा वर्षीय अल्पवयीन मुलीला अडवून हात पकडला; प्रेमाची जबरदस्ती करणाऱ्या तरुणाविरुद्ध तक्रार

एक्झरबीया, हिंजवडी हिल्स फेज 2 ) सोसायटी नेरे दत्तवाडी परिसरातील धक्कादायक प्रकार; पाठलाग करून मोबाईल नंबर व ओळख मागितल्याचा आरोप हिंजवडी | प्रतिनिधी : दि....

error: Content is protected !!