खडकी कॅन्टोन्मेंट | प्रतिनिधी : दि. 24 मार्च 2026 देशासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणारे शहीद भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या 95 व्या बलिदान स्मृतिदिनानिमित्त तसेच वंदेमातरम गीताच्या निर्मितीच्या 150 व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून वंदेमातरम संघटनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

खडकीतील आझाद मित्र मंडळाच्या हॉलमध्ये पार पडलेल्या या शिबिरात तब्बल 75 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले.
कार्यक्रमाची सुरुवात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य अभय सावंत यांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर संघटनेचे प्रांत अध्यक्ष विकास हांडे व प्रांत कार्याध्यक्ष राजेश शर्मा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना विकास हांडे यांनी “रक्तदान” या शब्दाऐवजी “रक्तसेवा” हा शब्द अधिक योग्य असल्याचे मत व्यक्त केले. “कारण रक्तदान केल्यानंतर शरीरात पुन्हा रक्त निर्माण होते, त्यामुळे हा ‘दान’ नसून समाजासाठीची सेवा आहे,” असे त्यांनी सांगितले.
नामनिर्देशित सदस्य अभय सावंत यांनीही संघटनेच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. शिबिरात महिला व युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शहीदांना आदरांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक खडकी विभाग अध्यक्ष शिरीष रोच यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेश काकडे यांनी मानले. याप्रसंगी अॅड. इंद्रकुमार बन्सल, शरद रोच, महादेव नाईक,अॅड. घाणेकर, जितेंद्र परदेशी गणेश जगताप अॅड. पांडुरंग कोरके आदी मान्यवर तसेच विविध संस्था-संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शिबिर यशस्वी करण्यासाठी संघटनेचे राजेश राजपूत, अॅड. योगेश आहेर, दीपक चार्या, विनोद काळे, करण चव्हाण, प्रसाद अवरादी व इतर कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व रक्तदात्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या शिबिरासाठी आझाद मित्र मंडळ व पीएसआय ब्लड बँकेचे विशेष सहकार्य लाभले.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏














