Homeमहाराष्ट्रअनिल अनंतराव पाराशर यांची विश्व सनातन हिंदू फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश संगठन मंत्रीपदी...

अनिल अनंतराव पाराशर यांची विश्व सनातन हिंदू फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश संगठन मंत्रीपदी नियुक्ती

धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याला नवे बळ – राज्यभर संघटन विस्ताराची जबाबदारी

पुणे | प्रतिनिधी : दि. 23 मार्च 2026:             महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागातील सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी अनिल अनंतराव पाराशर यांची विश्व सनातन हिंदू फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश संगठन मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  पाराशर यांना संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष ज्ञानेश्वर चौहान यांच्या हस्ते दिनांक 22 मार्च 2026 रोजी नियुक्तीपत्र देण्यात आले.

या नियुक्तीनंतर पाराशर यांच्यावर महाराष्ट्र राज्यातील फाउंडेशनच्या धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे समन्वय, संचालन व देखरेख करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
तसेच, जिल्हास्तरावर संघटनाचा विस्तार करणे, पदाधिकाऱ्यांची नियुक्ती व मार्गदर्शन करणे, कार्यकर्ते व सदस्यसंख्या वाढविणे यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही त्यांच्याकडे देण्यात आल्या आहेत. फाउंडेशनच्या नियम व मार्गदर्शक तत्वांचे पालन करत सर्व उपक्रम कायद्याच्या चौकटीत व सामाजिक मर्यादांनुसार राबविण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असेल.
याशिवाय, राज्यस्तरीय बैठक, विविध अभियान व सेवा कार्यक्रमांचे आयोजन करणे तसेच वेळोवेळी कामकाजाचा अहवाल राष्ट्रीय नेतृत्वाकडे सादर करणे, ही कर्तव्येही पार पाडावी लागणार आहेत.
या नियुक्तीबद्दल विविध स्तरातून पाराशर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या अनुभवाचा फाउंडेशनच्या कार्याला निश्चितच मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
– पुणे पीसीएमसी न्यूज 24.live                              मुख्य संपादक – हरीश शर्मा                                      मो. 9822220090

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

येरवडा ओपन जेलमध्ये आत्मनिर्भरतेचा नवा उपक्रम; इनरव्हील क्लबकडून ऊस रस मशीनची भेट

कैद्यांच्या पुनर्वसनाला चालना , ‘श्रुंखला उपहारगृह’ला मिळणार नवा उत्पन्नाचा स्त्रोत पुणे | प्रतिनिधी :  दि. 21 मार्च 2026 समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डिस्ट्रिक्ट 313...

वंदे मातरम संघटना खडकी विभाग तर्फे खडकीत 23 मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिर

खडकी कॅन्टोन्मेंट | प्रतिनिधी :  दि. 21 मार्च 2026  वंदे मातरम् संघटना खडकी विभाग च्या  वतीने सालाबादप्रमाणे यंदाही 23 मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिराचे...

ईद-उल-फितर 21 मार्चला साजरी; पुणे- पिंपरी चिंचवड मध्ये नमाज वेळापत्रक जाहीर, महिलांसाठी विशेष व्यवस्था

रमजानचा चंद्र न दिसल्याने शनिवारी ईद; मशिदींमध्ये सकाळी 7 ते 11 दरम्यान नमाज – पोलिसांकडून वाहतूक बदलांची तयारी बोपोडी  | प्रतिनिधी :  दि. 20 मार्च...

आंबेडकर जयंतीतील गुन्ह्यांवरून वाद पेटला; उपमहापौर वाडेकरांची सरकारला थेट मागणी

२०१६ ते २०२४ मधील प्रकरणे प्रलंबित; इतर उत्सवांना सवलत, मग आंबेडकरी कार्यकर्त्यांना का नाही? बोपोडी | प्रतिनिधी :  दि. १८ मार्च २०२६      आंबेडकर...

क्लासवरून परतणाऱ्या दहा वर्षीय अल्पवयीन मुलीला अडवून हात पकडला; प्रेमाची जबरदस्ती करणाऱ्या तरुणाविरुद्ध तक्रार

एक्झरबीया, हिंजवडी हिल्स फेज 2 ) सोसायटी नेरे दत्तवाडी परिसरातील धक्कादायक प्रकार; पाठलाग करून मोबाईल नंबर व ओळख मागितल्याचा आरोप हिंजवडी | प्रतिनिधी : दि....

error: Content is protected !!