पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
औंध / प्रतिनिधी : दि. १४ ऑक्टोबर
सुस येथील महामार्गावरील पुलावरून पाषाणकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या महिनाभरापासून मोठ्या प्रमाणात खडी पसरलेली असून, या खडीमुळे दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. विशेषतः पुलावरून उतरताना तीव्र उतार असल्याने वाहनांचा तोल जाऊन गंभीर अपघाताची शक्यता वाढली आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, “या ठिकाणी खडी पसरलेली असून दिवसाढवळ्या दोन ते तीन अपघात होत आहेत. रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिक धोकादायक बनते.” रविवार १२ ऑक्टोबर रात्री देखील एका युवकाची ऍक्टिवा दुचाकी घसरून अपघात झाला. सुदैवाने त्या युवकाला गंभीर दुखापत झाली नाही.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सोमवार, दि. १३ ऑक्टोबर ला पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात “चोवीस तासांच्या आत खडी हटवली नाही, तर मनसे स्टाईल रास्तारोको आंदोलन करण्यात येईल” असा इशारा देण्यात आला आहे. तसेच होणाऱ्या संभाव्य अपघातांसाठी महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण छत्रपती शिवाजीनगर कोथरूड विभाग, तसेच पांडुरंग सुतार, अजय नेवसे, शिवम दळवी, प्रेमनाथ उमाप, संदीप काळे, योगेश शिंदे आणि किशोर इंगवले उपस्थित होते.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏




















