Homeपुणेविद्यार्थ्यांचे बसपास जप्त करून गैरवर्तन; मनसेकडून पीएमपीएमएलला इशारा — “२४ तासांत पास...

विद्यार्थ्यांचे बसपास जप्त करून गैरवर्तन; मनसेकडून पीएमपीएमएलला इशारा — “२४ तासांत पास परत द्या, नाहीतर मनसे स्टाईल आंदोलन ठरलेलं!”

पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live

बालेवाडी आगारातील बसचालक-वाहकाकडून दोन विद्यार्थ्यांचे बसपास काढून घेण्याची घटना; पालकांना धमक्या, मनसेकडून तीव्र निषेध

औंध / प्रतिनिधी: दि. १५ ऑक्टोबर
बालेवाडी बस डेपो अंतर्गत चालणाऱ्या बस क्रमांक MH 12/1223 तसेच म्हाळुंगे ते मनपा क्रमांक 114 या बसमधील चालक आणि वाहकाच्या गैरवर्तनामुळे दोन विद्यार्थ्यांना बसपास नसल्याने शाळेत जाणे अशक्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पीएमपीएमएल प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले आहे.
घटना दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ ची असून सकाळी सुमारास ग्रीनपार्क हॉटेल बसथांबा येथे भारत इंग्लिश स्कूल, शिवाजीनगरचे इयत्ता ९ वीचे दोन विद्यार्थी
आदित्य संतोष चव्हाण (वय १४)
व कृष्णा युवराज निंबाळकर (वय १४)
बसने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान कृष्णा याला उलट्या होऊ लागल्याने तो बाणेर फाटा येथे उतरला, त्याचबरोबर त्याचा मित्र आदित्यही त्याच्यासोबत उतरला. याच वेळी बसचालक आणि वाहकाने दोन्ही विद्यार्थ्यांचे बसपास जप्त केले.
यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी बालेवाडी आगार येथे जाऊन वारंवार तक्रारी दिल्या, मात्र तेथील अधिकाऱ्यांनी दाद न देता “पोलिसांकडे देऊ” अशी धमकी दिल्याचा आरोप मनसेने केला आहे.
या घटनेमुळे दोन्ही विद्यार्थी परीक्षा काळात शाळेत जाऊ शकले नाहीत. आदित्यचे वडील रोजंदारीचे काम सोडून दररोज दुचाकीवरून विद्यार्थ्यांना शाळेत पोचवत आहेत.
मनसेचे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन मा. पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, स्वारगेट, पुणे यांना देण्यात आले. तसेच याची प्रत आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे  यांना रजिस्टर पोस्टाद्वारे पाठविण्यात आली.
मनसेने प्रशासनाला विचारले आहे की, “बसचालक व वाहकास विद्यार्थ्यांचे पास काढून घेण्याची परवानगी कोणी दिली?” तसेच २४ तासांच्या आत विद्यार्थ्यांचे पास परत देण्याची मागणी केली आहे.
मनसेने इशारा दिला आहे की, “जर पास परत न दिल्यास आणि विद्यार्थ्यांना काही अनुचित घडले, तर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सर्वस्वी जबाबदार असतील. तसेच मनसे स्टाईल आंदोलनाचा सामना करावा लागेल.”
याप्रसंगी संदीप काळे, शिवम दळवी, मिलन भोरडे, गोकुळ अडागळे, विकास मोहिते, किशोर इंगवले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ज्येष्ठ पत्रकार अनंत तुकाराम पवार यांना मिळाला आधार – तरुण मिश्रा यांच्या एनजीओकडून मदतीचा...

हरीश शर्मा | पुणे पीसीएमसी न्यूज नेटवर्क :            दि. 28 मार्च 2026               ...

पुणे महापालिकेत मीडियावर गंडांतर? महापौर मंजुषा नागपुरे यांच्या निर्णयावरून वाद; पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न

हरीश शर्मा | पुणे पीसीएमसी न्यूज नेटवर्क - दि.  25 मार्च 2026 पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रवेशावर मर्यादा आणण्याचा निर्णय महापौर मंजुषा...

खडकीत शहीदांना अभिवादन; वंदेमातरम संघटनेचे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

खडकी कॅन्टोन्मेंट | प्रतिनिधी : दि.  24 मार्च 2026 देशासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणारे शहीद भगत सिंह, सुखदेव  आणि राजगुरू यांच्या 95 व्या...

अनिल अनंतराव पाराशर यांची विश्व सनातन हिंदू फाउंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश संगठन मंत्रीपदी नियुक्ती

धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याला नवे बळ – राज्यभर संघटन विस्ताराची जबाबदारी पुणे | प्रतिनिधी : दि. 23 मार्च 2026:           ...

येरवडा ओपन जेलमध्ये आत्मनिर्भरतेचा नवा उपक्रम; इनरव्हील क्लबकडून ऊस रस मशीनची भेट

कैद्यांच्या पुनर्वसनाला चालना , ‘श्रुंखला उपहारगृह’ला मिळणार नवा उत्पन्नाचा स्त्रोत पुणे | प्रतिनिधी :  दि. 21 मार्च 2026 समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डिस्ट्रिक्ट 313...

error: Content is protected !!