पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live
खडकी / प्रतिनिधी: सामाजिक कार्यकर्ते शहाबाज सय्यद यांनी खडकी बाजार येथील लाल बहादूर शास्त्री शाळेच्या आवारात असलेल्या बोर्डाच्या स्व. सुरेश हेमराज गांधी व्यायामशाळा मित्रसागर मंडळ ट्रस्टमध्ये सुरू असलेल्या खाजगी जिम व फिटनेस क्लासेस संदर्भात तक्रार खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे केली होती.
सय्यद यांनी तक्रारीत नमूद केले की, सार्वजनिक उपयोगासाठी असलेली ही जागा खासगी व्यावसायिक उपक्रमांसाठी वापरली जात असून, हे सरळसरळ नियमांचे उल्लंघन आहे. मात्र या तक्रारीवर बोर्डाने दीर्घकाळ काहीच प्रतिसाद दिला नाही.

यानंतर शहाबाज सय्यद यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी मिनाक्षी लोहिया यांची कार्यालयात भेट घेऊन आपल्या अर्जावर झालेल्या कारवाईबाबत विचारणा केली. “जर तुम्ही कारवाई करणार नसाल तर मी न्यायालयात जाणार,” असा इशारा सय्यद यांनी दिला. त्यावर लोहिया यांनी संबंधितांना शो कॉज नोटीस दिल्याचे सांगत “तुमच्या अर्जाची दखल घेतली आहे” असे स्पष्ट केले.
यानंतर बोर्डाकडून सय्यद यांना अधिकृत पत्राद्वारे “संबंधितांना नोटीस दिली आहे” अशी माहिती देण्यात आली. मात्र या पत्रात दिलेल्या रेफरन्समधील तारखेमध्ये गंभीर चूक झाल्याचे सय्यद यांच्या लक्षात आले. पत्रात त्यांच्या अर्जाची तारीख 25/08/2025 ऐवजी 25/08/205 अशी नमूद करण्यात आली होती.
ही टंक त्रुटी आहे की जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न — असा प्रश्न सय्यद यांनी उपस्थित केला आहे.
“ही चूक साधी नाही, तर प्रशासनातील निष्काळजीपणाचे द्योतक आहे. मी याबाबत पुढील कायदेशीर पाऊल उचलणार आहे,” असे सय्यद यांनी पुणे पीसीएमसी न्यूज 24:Live शी बोलताना सांगितले.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून मात्र या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏















