खडकी / प्रतिनिधी :दि. २४ नोव्हेंबर २०२५ अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 आणि नियम 2011 अंतर्गत खडकी बाजार येथील ‘कन्नन ईडली सेंटर’ न्यू एक्सेलसिअर, खडकी पुणे येथे चालणाऱ्या स्नॅक्स सेंटर वर अन्न औषध प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. संबंधित तक्रारींची पडताळणी करण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सावळे यांनी 21नोव्हेंबर2025 रोजी ऑनलाईन तपासणी केली होती.
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) अंतर्गत चालणाऱ्या तपासणीमध्ये, परवाना/नोंदणी न घेता अवैधपणे अन्न व्यवसाय चालवल्याचे आढळून आले. अन्न सुरक्षा कायद्यानुसार, कोणतीही खानावळ, दुकान, सेंटर किंवा अन्नाशी संबंधित व्यवसाय FSSAI परवाना अथवा नोंदणीशिवाय चालवणे कायदेशीर गुन्हा आहे.
तपासात ‘कन्नन इडली सेंटर’ ला तात्काळ अन्न व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले व परवाना घेईपर्यंत कोणतीही अन्न विक्री अथवा प्रक्रिया करण्यास मनाई केली आहे. सदर कार्यवाही अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 तसेच अन्न सुरक्षा व मानके नियम 2011 अंतर्गत करण्यात आली असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी पुढील काळात नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होणार असल्याचा इशाराही दिला आहे
याबाबत खडकीतील सामाजिक कार्यकर्ते शहाबाज सय्यद यांनी ‘कन्नन इडली सेंटर’ मध्ये खराब कांदे व किचन मध्ये अस्वछता बाबत दि. ६ नोव्हेंबर २०२५ ला मेल करून तक्रार केली होती.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏













