खडकी / प्रतिनिधी : दिनांक ५ डिसेंबर २०२५ भारतीय स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणास्त्रोत ठरलेल्या, देशाच्या ‘ वंदेमातरम राष्ट्रगीताला ‘ दीडशे वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने वंदेमातरम संघटना खडकी विभागाच्या वतीने खडकीतील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘वंदेमातरम गीत गायन स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आलेले आहे, सदर स्पर्धा ही समूहगान व वैयक्तिक अशा दोन गटांमध्ये होणार असून विजेत्यांना संघटनेच्या वतीने पारितोषिक देण्यात येणार असून, सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे, कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू व संघटनेचे प्रांत अध्यक्ष विकास हांडे उपस्थित राहणार असून सदर कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावे, असे आवाहन संघटनेचे प्रांत कार्याध्यक्ष राजेश शर्मा व खडकी विभाग अध्यक्ष शिरीष रोच यांनी केले आहे.
स्पर्धा शनिवार दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून. सुरवात होणार आहे. खडकी बाजारातील लालबहादूर शास्त्री हायस्कूलचे ओपन ऑडिटोरियम खडकी पुणे 3 या ठिकाणी होणार आहे

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏














