बोपोडी / प्रतिनिधी : दिनांक ३ डिसेंबर २०२५ येथील वत्सला बाई नानासाहेब कांबळे यांचे बुधवार, दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या ८४ वर्षाच्या होत्या.
भारतीय बुद्ध शासन सभा, बोपोडीचे सभासद तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल नानासाहेब कांबळे व महेंद्र कांबळे यांचे त्या मातोश्री होत्या. त्यांच्या निधनाने कांबळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून सामाजिक व स्थानिक पातळीवरही हळहळ व्यक्त केली जात आहे.
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.
त्यांची अंत्ययात्रा बुधवार, दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता बोपोडी स्मशानभूमी येथे होणार आहे.
— पुणे पीसीएमसी न्यूज 24: Live

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏











