खडकी / प्रतिनिधी : दिनांक ५ डिसेंबर २०२५ खडकी बाजार परिसरात श्री दत्त जयंती मोठ्या भक्तिभावात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. गाडी अड्डा येथील श्री दत्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
सालाबादप्रमाणे यंदाही पीएमपीएल बस स्थानक परिसरात लक्ष्मी रिक्षा स्टँड सुर्यमुखी दत्त मंदिराची भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती. संध्याकाळी आयोजित महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ हजारो दत्तभक्तांनी घेतला.
माणुसकी मित्र मंडळ व श्री गुरुदेव दत्त प्रतिष्ठानतर्फे सुरेश हेमराज गांधी चौक येथील ‘आपलाऔदुंबर’ दत्त मंदिराची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. श्रद्धाळूंना खिचडी आणि गूडदाणीचा प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले.
दत्तजयंती निमित्त खडकी परिसर दत्तनामाच्या गजराने दुमदुमून गेला. बोपोडी, साप्रस, रेंजहिल, औंध रोड, वाकडेवाडी, शिवाजीनगर आदी भागातही भक्तिमय वातावरणात दत्त जयंती उत्साहात साजरी झाली.

मुख्य संपादक – हरीश शर्मा.
नमस्कार 🙏 मी हरीश शर्मा ( पत्रकार ) गेली 15 वर्षे पुणे शहर व जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींवर ग्राउंड लेवल वर पुण्यातील प्रसिद्ध वर्तमानपत्रात बातमीदारी केली असून यासाठी मला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच कोरोना काळात ही जीवाची पर्वा न करता प्रामाणिक पत्रकारीता केल्याबद्दल ही ‘कोरोना योद्धा ‘ पुरस्काराने ही विविध संस्था संघटना ने सन्मानित केले . पत्रकार संघ तसेच ‘मुंबई वृत्तवाहिनी वृत्तपत्र पुणे जिल्हा शहर उपाध्यक्ष’ पदी असताना ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे हे सर्व करत असताना आता थोडस वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे मित्रांनो यापुढे ही न्युज पोर्टल चॅनेल च्या माध्यमातून माझ्या हातून चांगले कार्य व ताज्या घडामोडींवर प्रखर प्रकाश पडावा व माझ्या हातून निष्पक्ष निर्भीड बातमी यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची अपेक्षा करून चॅनेल चा श्री गणेशा करीत आहे. यासाठी आपले पाठबळ कायम माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. 🙏











